भगवान श्री परशुराम जयंती उत्सव - 2025
नमस्कार मंडळी,
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान श्री परशुराम जयंती उत्सव मंगळवार दि. 29 एप्रिल, 2025 रोजी सायं. 5.00 वा. ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पालखी सोहळा (मार्ग - पेटाळा (गडकरी सभागृह) ते महाव्दार चौक ते तटाकडील तालीम, अर्ध शिवाजी पुतळा मार्गे पेटाळा (गडकरी सभागृह) यानंतर श्री परशुरामांचा जन्मकाळ, आरती, भक्तीगीतांचा कार्यक्रम व महाप्रसाद वितरण असा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी 2000 हून अधिक बांधव आणि भगिनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज आहे. या निमित्ताने आपला समाज एकत्र येतो, संपर्क होतो, विचारांची देवाण-घेवाण होते.
असे मोठे उत्सव हे आर्थिक सहाय्यामुळेच यशस्वी संपन्न होतात अशी आमची धारणा आहे. ज्या समाजात आपण जन्मांस आलो, ज्या समाजाचा आपणांस विशेष अभिमान आहे, त्या समाजाच्या उपक्रमास आर्थिक हातभार लावणे आणि कार्यक्रमांस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणे हे पण आपले कर्तव्य आहे. आमची आपणांस विनंती कीं, आपल्यासारख्या दातृत्व असणार्या दानशूर व्यक्तींनी आपल्या समाजासाठीच्या या उपक्रमांस सढळ हस्ते यथाशक्ती आर्थिक सहाय्य करून कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या यशस्वी संपन्न होणेसाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती.
तसेच या भगवान श्री परशुराम जन्मोत्सव - 2025 साठी यथाशक्ती आर्थिक सहाय्य करणार्या सर्वांना विनंती कीं, आपण दिलेल्या देणगीची रितसर पावती दिली जाते, तशी पावती घ्यावी. देणगीचा स्वीकार व पावती प्रदान खालील संस्थांच्या मार्फतच केवळ केले जाते याची नोंद घ्यावी.
(1) ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम), कोल्हापूर.
(2) चित्पावन संघ, कोल्हापूर
(3) कर्हाडे ब्राह्मण संघ, कोल्हापूर.
कोल्हापूर चित्पावन संस्थेचे बँक तपशील खालील प्रमाणे देत आहोत त्यावर पैसे ट्रान्सफर करून सहकार्य करावे ही विनंती.
आपले नम्र,
संचालक व सल्लागार,
कोल्हापूर चित्पावन संघ.
संपर्क :
मकरंद करंदीकर 9421113005
प्रसाद भिडे 9822248500
केदार जोशी 7588839527
संतोष साने 8459019091
सौ संगीता आपटे 8149480034
Bank of India , Account number 090210110016181 , IFSC CODE - BKID0000902 , ACCOUNT HOLDER NAME - KOLHAPUR CHITPAVAN SANGH
चित्पावन संघ कोल्हापूरच्या QR Code/ Scanner वरून payment केल्यास 7620546225 ya कार्यालयाच्या What's app no. वर तुमचे संपूर्ण नाव, मोबाईल no. आणि राहण्याचे ठिकाण अवश्य पाठवा... त्यासोबत त्याचा स्क्रीन शॉट सुद्धा शेअर करावा ही विनंती 🙏
Blood Donation Camp dated 09.06.2024.
कोल्हापूर चित्पावन संघ व वुई फॉर अवर्स तर्फे आयोजित चित्पावन युवा महोत्सवाच्या यशस्वी नियोजनानंतर आणखी एक आगळा वेगळा महोत्सव.....
चित्पावन खाद्य महोत्सव.
स्थळ : मंगलधाम हॉल, बिनखांबी गणेश मंदिर जवळ.कोल्हापूर, दिनांक : २४ ऑगस्ट २०२४ शनिवार, वेळ : संध्याकाळी ६.०० ते रात्री ९.००
तर चित्पावन रसिकहो... आपण आपल्या अंगातील कला गुण तर सगळ्यांना दाखवले.... अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला. आता जरा आपल्या जिभेला 👅 एक वेगळी तृप्ती देऊयात काय ? तर आता सर्वांनी आपल्या अंगात लपलेला एक शेफ बाहेर काढुया... आपल्यातील अनेकांना किचन मध्ये लुडबुड करायची सवय असतेच... पण ती घरच्या पुरतीच. जर आपण एखादा पदार्थ उत्तम बनवत असू आणि तो एखाद्याला खायला दिल्यावर त्याच्याकडून येणारी तारीफ ऐकल्यावर होणारे समाधान काही निराळंच. तर मग चला यंदा आपण एक अनोखा प्रयत्न करू. चित्पावन खाद्य महोत्सवात आपल्या मधल्या लपलेल्या शेफला वाट देऊ आणि आपल्या चमचमीत खाद्य पदार्थांनी आपल्याच आप्त स्वकियाना तृप्त करूया.
चित्पावन खाद्य महोत्सव 2024
1. यामध्ये प्रत्येकी एक स्टॉल देण्यात येईल.
2. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी दिली जाईल.
3. स्टॉल साठी बुकिंग आवश्यक असेल. रुपये २००/- एका स्टॉल साठी सहभाग शुल्क असेल.
4. फक्त चित्पावन कोकणस्थ सदस्यांना स्टॉल देण्यात येईल.
5. एका प्रकारच्या खाद्य पदार्थाचा एकच स्टॉल देण्यात येईल.
6. सर्व खाद्य पदार्थ सहभागी स्टॉल धारकांनी स्वतः बनवून आणायचे आहे.
7. बाहेरून कोणाचाही तयार पदार्थ आणू नये.
8. खाद्य पदार्थांची किंमत ₹ ५० पेक्षा जास्त असू नये. जेणेकरून सर्वांना त्याचा मनसोक्त उपभोग घेता येईल.
9. पदार्थ गरम करण्याचे साहित्य,देण्यासाठी डिश - चमचे ई.. स्वतः आणायच्या आहेत.
10. मर्यादित स्टॉल असल्याने लवकरात लवकर बुकिंग करावे ही विनंती. बुकिंग ची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क :
श्री. अमेय गोखले : 8408065200 श्री . महेश पटवर्धन : 9822787931
श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा
सालाबाद प्रमाणे संस्थेचा श्री अष्टमी महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम कोल्हापूर येथे संपन्न झाला.
आमच्या महिला मंडळाच्या महिलांनी खूपच मेहनितीने सोहळा संपन्न केला. महाप्रसादाचा लाभ १,००० भक्तांनी घेतला व सायंकाळी १०,००० भक्तांनी देवींचे दर्शन घेतले, तसेच १५० लोकांनी घरपोच प्रसादाचा लाभ घेतला. यावर्षी सुद्धा हा सोहळा युट्यूब व फेसबुक पेजवरून लाईव्ह दाखवण्यात आला. याचा देश विदेशातील अनेक न्याती बांधवांनी लाभ घेतला व या उपक्रमाचे कौतुक केले.